Friday, September 12, 2008

सरला पावसाळा........

सरला पावसाळा,
तुझ्या विनाच या वर्षी.
मेघ बरसले,
तुझ्या विनाच या वर्षी.

सरला पावसाळा तरीही,
अजुनी कोरडीच माती.
रुक्ष भासे निसर्ग हा
अन्कुराचा लवलेश नाही.

सरला पावसाळा,
मुकलो तुज्या गंधालाही.
सरला पावसाळा,
ना भिजलो मी एकदाही.

झुरतो असा,
प्रत्येक क्षणी.
तुझीच आठवण
माझ्या मनी.

सरला पावसाळा,
तुझ्या विनाच या वर्षी
तरीही भिजवले,
मज आज अश्रुनी.

आदित्य अरुण उत्तुरकर

Friday, August 15, 2008

एकांत.....

एकांतात असताना मी विचार करतो.......
भारताचा,
भारतीय संस्कृतीचा,
भारतीय अस्मितेचा,
अन् भविष्याचा.
होंत असलेल्या बदलांचा,
आधुनिकतेचा,
वैफल्याचा,
अन् समृधीचा.
सीमेवर लधानार्य जवानांचा,
त्यांच्या बलीदानाचा,
त्यांच्या बायका-पोरांचा,
अन् राष्ट्रभक्तिचा.
देशातील लोकसंख्येचा,
बेकरीचा,
गरीबीचा,
अन् अनेक सामाजीक समस्यांचा.
या राज्कर्नाचा,
या लोक्सत्तेचा,
नेत्यांच्या वचनांचा,
अन् भ्रष्टाचाराचा.
या पर्यवारानाचा,
जीवन देणार्या झाडांचा,
वृक्ष तोडीचा,
अन् निसर्ग प्रेमींचा.

..... काय होणार ह्या संस्कृतीचे
ज्याचा ह्रास होतो,
काय करणार या इतीहासचे,
जो लोकांना अर्धवटच माहीत असतो.
मी विचार करतो, काय होणार ह्या देशाचे,
काय होणार ह्या जनतेचे,
...अन् काय होणार
माझ्या भविष्याचे.

आदित्य अ. उत्तुरकर.